सातारा जिल्हा बँकेत शिवसेनेला पहिला संचालक मिळण्याचा मार्ग मोकळा; संजय मोरे यांच्या बिनविरोध निवडीने महाबळेश्वरमध्ये राजकीय समीकरणांना नवे वळण!
सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाबळेश्वर तालुका सोसायटी गटातून महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. माजी संचालक राजेंद्र राजापुरे आणि त्यांच्या पत्नी सौ रुपाली राजापुरे यांच्या उमेदवारी अर्जांबाबत कोल्हापूर खंडपीठाने अपात्रतेचा निर्णय दिल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संजय मोरे यांच्या रूपाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिवसेनेला पहिला संचालक मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणात या घडामोडीमुळे नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, जिल्हा बँकेच्या राजकारणात शिवसेनेची उपस्थिती अधिक ठळक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमितदादा कदम यांच्या पाठपुराव्याची चर्चा.
या संपूर्ण प्रकरणात माजी शिक्षण सभापती अमित दादा कदम यांनी संजय मोरे यांच्या उमेदवारीसाठी केलेल्या पाठपुराव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे या घडामोडींकडे महाबळेश्वर तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. संजय मोरे यांच्या संभाव्य बिनविरोध निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मान्यवरांकडून संजय मोरे यांचे अभिनंदन
या महत्त्वपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवरजिल्हा परिषद सदस्य श्री. अजित संकपाळ, युवा नेते सचिन कदम, गणेश उत्तेकर, आनंद धनावडे, विश्वनाथदादा संकपाळ, विश्वनाथ मोरे, राम संकपाळ, सुनील संकपाळ, विशाल संकपाळ, रोहित जाधव, अक्षय शिंदे, सूर्यकांत जाधव, मोहसीन शेख आणि ओंकार शिंदे यांनी संजय मोरे यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था मानली जाते. अशा बँकेच्या संचालक मंडळात शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण होणे ही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरू शकते.
संजय मोरे यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे आकाराला येतात आणि जिल्हा बँकेच्या आगामी राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






