अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका ; देवेंद्र फडणवीस !!

आज दुपारनंतर प्रचंड वेगाने वारे वाहणार,पावसाचा रेड अलर्ट, देवेंद्र फडणवीसांची नागरिकांना वॉर्निंग, म्हणाले दुपानंतर घराबाहेर पडू नका .. 

Friends are not crutches, clarifies Fadnavis after Shah's statement - The  Hindu

प्रतिनिधी; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी सभागृहात एख छोटेखानी निवेदन दिले. यामध्ये त्यांनी पाऊस आणि पूरपरिस्थितीच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आज दुपारनंतर अनेक भागात मोठ्याप्रमाणावर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. कोणीही अत्यावश्यक कारण असल्याशिवाय प्रवास करु नये. तरुणांनी या काळात पर्यटनासाठी धबधबे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मी आज राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. आज मोठ्याप्रमाणावर पावसाचा अंदाज असल्याने मी उद्या सभागृहात यावर सविस्तर निवेदन देईन. राज्य सरकारने सर्व तयारी केली होती. गेल्या दोन दिवसांत दुर्घटना होऊ शकते, अशा जागा हेरुन तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.  या सगळ्यात कुठेही सरकारी यंत्रणा कमी पडणार नाही, असे आश्वासन मी देतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

गेल्या दोन-तीन दिवसांत ज्या घटना घडल्या आहेत, त्याबाबत कारवाई झाली आहे. यापू्र्वी पावसाच्यादृष्टीने यंत्रणांनी तयारीही केली होती. राजकीय बोलायच असेल तर मागच्या काळात किती मृत्यू झाले याची आकडेवारी मी देऊ शकतो. पण त्याने गेलेले जीव परत येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला या सगळ्या परिस्थितीकडे संवेदनशीलपणे पाहावे लागेल. पावसाच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा